भूम (प्रतिनिधी)- उष्णतेचा वाढता पारा विचारात घेता मुख्य बाजारपेठेत बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी व्यापारी बांधव आणि कोष्टी समाज ट्रस्ट बांधवांच्यावतीने मुख्य मेनरोड येथे पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पानपोईचे उद्घाटन देखील जेष्ठ समाज बांधवांच्या हस्तेच करण्यात आले.
रविवार दिनांक 20 एप्रिल 2026 अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पानपोईचे उद्घाटन करण्यात आले, पाणी पोईसाठी मोठाल्या रांजणातून पाणी नैसर्गिक रित्या थंड व्हावे यासाठी मोठे रांजण उपलब्ध केले आहे. त्याला कपडा देखील गुंडळला आहे. जेणेकरून पाण्याचा थंडावा आणखी वाढावा, याशिवाय मुख्य रस्त्यावर पाणपोईच्या वरती मोठा कपडा देखील टाकलेला आहे. जेणेकरून पाणी स्वच्छ राहील त्यामध्ये घाण जाणार नाही याची देखील मंडळांनी दखल घेतली आहे. यावेळी आलमप्रभु देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दिलीप शाळू महाराज, नगरसेवक विठ्ठल बागडे, ज्येष्ठ समाज बांधव पांडुरंग बुगड, आबासाहेब नवले, धनंजय बाबर, धनंजय बागडे, पांडुरंग वरवडे, अंबादास वरवडे, बापू डिसले, संदीप बागडे, शंकर म्हेत्रे, सुभाष उपरे, बाळासाहेब फासे आदींची उपस्थिती होती.
