तुळजापूर (प्रतिनिधी)- अक्षय तृतीयेच्या सायंकाळी तीर्थक्षेत्र तुळजापुरला मुसळधार पावसाने झोडपून काढले वादळी वारे विजेच्या कडकटासह झालेल्या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणीच पाणी झाले होते. तसेच तालुक्यातही सर्वदूर पाऊस झाल्याचे वृत्त आहे. 

तीर्थक्षेत्र तुळजापुरात दुपारी पाच वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात प्रारंभ झाला यावेळी चे विजेच्या कडकडाट होता. यावेळी वादळीवार एवढे होते की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व व्यापाऱ्यांनी सावलीसाठी लावलेले पडदे यात उडाले. तसेच शहराच्या सखल भागात पाणीच पाणी झाले. मंदिरासमोर पाणी साचले होते. मात्र तेथील युवकांनी लोखंडे अँगलवरील अडकलेले प्लास्टिक काढल्याने मंदिराला समोरील पाणी नाल्यातून वाहून खाली गेले. या पावसामुळे व्यापारी मोठे नुकसान झाले.या अचानक झालेल्या पावसामुळे भाविकांना भिजतच दर्शन घ्यावे लागले. पाऊस कमी होताच भाविकांनी थेट गावी जाणे पसंत केल्याने व्यापारी वर्गाचा व्यवसाय या कालावधीत झाला नाही या झालेल्या अवकाळी पावसामुळे तीर्थक्षेत्र तुळजापुरात भाविक नागरिक व्यापारी यांचे हाल झाले की दिसून आले. या वादळवाच्या सह झालेल्या पावसामुळेगोपाळ नगर ये ये वृक्ष कोसळुनतीन मोटार सायकली चे नुकसान झाले. तसेच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, काडगाव, मसला, धनेगाव, सारोळा, वडगाव, काटी, दहिवडी येथेही पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

 
Top