तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह तालुक्यात रविवार दि 20 एप्रिल रोजी अक्षय तृतीया सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अक्षय तृतीया निमित्ताने श्री तुळजाभवानी तिचे मातेस शिवकालीन सुवर्ण अलंकार घालण्यात आले होत. अक्षय तृतीया निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शणार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अक्षय तृतीया निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेस पुजारीवृंद सह स्थानिकांनी आमरस पोळ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. अक्षय तृतीया निमित्ताने घरोघर पितरांना भोजन देण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने श्री तुळजाभवानी मंदिरात बालकांचे जावळविधी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अक्षय तृतीया निमित्ताने. कधी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती.


 
Top