भूम (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषे बरोबरच जर्मन, जापनीज, फ्रेंच इत्यादी भाषेवर प्रभुत्व मिळवावे व जगातील विविध क्षेत्रात यश मिळवावे. असे मत पत्रकार संजय मिस्कीन यांनी व्यक्त केले. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधारेवस्ती येथे सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी कर्मवीर परिवार आयोजित “गौरव सोहळा“ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी तालुका कृषी अधिकारी किशोर अंधारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परंडा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश कुकडे, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ टकले हे होते.
यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी सोमनाथ टकले व नूतन केंद्रप्रमुख संदीप मोरे, गणेश महाराज अंधारे, किशोर अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तोडकरी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राहुल अंधारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दत्तात्रय घोडके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी भालचंद्र पाटील, प्रवीण अंधारे, ज्ञानेश्वर कातुरे, अशोक बनसोडे, दत्तात्रय गुंजाळ, रत्नदीप अंधारे, अमोल चोपडे, अलका तांबे, मंजुषा सुरवसे, प्रमिला जावळे, विद्या वैद्य आदी कर्मवीर परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला. यावेळी संदीप मोरे, विशाल अंधारे, आरोही सांगडे, अनया अंधारे, प्रशांत क्षीरसागर, साधना अंधारे, पूजा विशाल ढगे, परसू गवारे, मनोज अंधारे, सुदाम पाटील, विशाल बापू ढगे यांचा सन्मान करण्यात आला.
