भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंभी येथील श्रीमती शिवगंगा कल्याणराव गटकळ वय 95 वर्ष यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे उपचारादरम्यान दि. 18 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या पुणे शिक्षण विभाग आयुक्त कार्यालयातील सेवानिवृत्त अधीक्षक किसन गटकळ व बळीराम गटकळ यांच्या मातोश्री होत. त्यांचेवर त्यांचे मूळ गावी आंभी ता. भूम येथे रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, पतरुंडे असा परिवार आहे.
