धाराशिव (प्रतिनिधी) - महामानव, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून तसेच ढोल ताशा, डीजेच्या दणदणाट व लेझीमच्या तालात, बँड बाजा आणि रॅली काढून मानवंदना देत भीम जयंतीचा जल्लोष दि.14 एप्रिल रोजी धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी प्रेरणादायी भीम गीतांच्या त्याच्यावर ताल धरीत मोठ्या उत्साहामध्ये दि.14 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर रात्री बारा वाजताच मानाची वंदना दिली. यावेळी विश्वरत्न, प्रकांड पंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत जयजयकार करण्यात आला. तर प्रचंड फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला.
धाराशिव येथील भीम नगरमधील क्रांती चौकातून सकाळी 8 वाजता समता सैनिक दलाच्यावतीने क्रांती चौकातून संचलन (प्रभात फेरी) काढण्यात आली. त्या रॅलीची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सलामी व मानवंदना देऊन करण्यात आली. यानंतर बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील व बुद्ध गाथा भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम, जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे, धनंजय वाघमारे, बाबासाहेब बनसोडे, गुणवंत सोनवणे, शीलाताई चंदनशिवे, मीनाताई लगाडे व गायकवाड (लोहारा) यांनी घेतली.
यावेळी आ कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, धनंजय शिंगाडे, रिपाइंचे नाईट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ, अरुण बनसोडे, तहसिलदार डॉ मृणाल जाधव, नायब तहसिलदार महादेव शिंदे, रिपाइंचे प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ, धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नेहा काकडे, मुख्याधिकारी नीता अंधारे, भारतीय जनता पार्टीचे मल्हार पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील, विशाल शिंगाडे, पृथ्वीराज चिलवंत, बाबासाहेब बनसोडे, समता सैनिक दलाचे सचिन दिलपाक, स्वराज जानराव, मनोरमाताई काटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शिवसेना जिल्हा प्रमुख अजित पिंगळे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, प्रवीण सुर्यवंशी, अर्जुन पवार, राजाभाऊ बागल, इलियास मुजावर, पांडू भोसले, नाना घाटगे, पप्पू मुंडे, मसूद नितीन काळे, अतुल लष्करे, अजय सरवदे, सुनील मळाळे, बाबा कांबळे, कुमार गायकवाड, महादेव एडके आदींसह महिला व पुरुष भिम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देता यावे यासाठी वही व पेन दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास अनेकांनी प्रतिसाद देत व वही पेन आदींचे मोठ्या प्रमाणात दान केले. तसेच शाहू फुले आंबेडकर उद्यान कृती समितीच्यावतीने रक्तदान शिबिर व गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी जमा केलेले वही पेन पुस्तक कंपास व इतर साहित्य जिल्हाधिकारी पुजा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसिलदार डॉ मृणाल जाधव, नायब तहसिलदार महादेव शिंदे, कृती समितीचे गणेश वाघमारे व पदाधिकारी उपस्थित होते. न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या संचाचे वितरण करण्यात आले. तर
कालकथीत अनिल गंगाधर शिंगाडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान दिवसभर वाटप करण्यात आला. तसेच शाहू फुले आंबेडकर कृती समितीच्यावतीने ही भोजनदान देण्यात आले. याबरोबरच डी के ग्रुप मित्रप्रेमींच्यावतीने देखील दिवसभर भोजनदान केले. या भोजनाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. पुतळा परिसरात भीम गीत गायन पार्टीच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांची प्रेरणादायी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
