धाराशिव (प्रतिनिधी) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात विविध ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील प्रमुख चौक, स्मारके तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,जेष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महामानवांच्या विचारांचा वारसा जपत समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांना अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजात समानतेची भावना रुजवण्यासाठी तसेच संविधानिक मूल्यांचे पालन करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात नगरसेवक तथा गटनेते खलिफा कुरेशी, नगरसेवक अयाज (बबलू) शेख, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक सर्फराज कुरेशी, नगरसेवक इस्माईल शेख, युवक जिल्हाध्यक्ष श्री शेखर घोडके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे, श्री जयंतराव देशमुख, श्री नरसिंह मेटकरी, ॲड. योगेश सोने पाटील, ॲड. अविनाश जाधव, श्री रवी ठेंगल, श्री सुरज वडवले, श्री सचिन अंधारे, श्री शुभम सुकाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून, उपस्थितांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या निमित्ताने सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.
%20%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87.jpg)