धाराशिव (प्रतिनिधी)- सौरभ भीमराव राठोड (रा. वडगांव, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी 1 लाख 9 हजार रुपयांची देणगी अर्पण केली.
सौरभ राठोड हे सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भक्तिभावाने ही देणगी अर्पण केली. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने राठोड कुटुंबाचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहायक जनसंपर्क अधिकारी अतुल भालेराव, विश्वास सातपुते तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
