भुम (प्रतिनिधी)- महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील कल्पकता पुरवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काजवा या हस्तलिखितेची निर्मिती केली आहे. या अनोख्या हस्तलिखिताचे प्रकाशन बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव (बुद्रुक) येथे दि.13 एप्रिल रोजी करण्यात आले.
शालेय वयापासून मुलांमध्ये वाचन आणि लेखन संस्कृती रुजवावी यासाठी काजवा हस्तलिखित मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता, सामान्य ज्ञान, कथा ,चारोळ्या ,निसर्ग चित्रे, रांगोळी, मेहंदी ,सुविचार ,माझं चित्र, वृत्तपत्रातील आलेल्या बातम्या ,छायाचित्रे, पुस्तक परिचय लेखन इत्यादीचा यामध्ये समावेश केला आहे.
प्रकाशन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “आजच्या डिजिटल युगात हाताने दिलेल्या हस्तलिखिताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे अशा उपक्रमामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास होतो असे मत बाल विकास प्रकल्पाधिकारी गणेश कुकडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शाहेदा हुसेनी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख प्रदीप खराडे , विस्ताराधिकारी संतोष जाधव,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब मारकड, महेश ठोंगे हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऐश्वर्या नवले यांनी केले तर आभार प्रदर्शन आर्या मारकड यांनी केले.
“ ग्रामीण भागातील आम्हा मुलांच्या मनातील दडलेले विचार आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काजवा या हस्तलिखितेच्या माध्यमातून आम्ही शब्दबद्ध केला आहे“
ऐश्वर्या नवले (संपादक)
%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87.jpg)