भुम (प्रतिनिधी)- 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून हारी महामुनी लिखित “ग्रंथालय व व्यवस्थापन” या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला विद्या विकास मंडळाचे सहसचिव तथा शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. रामेश्वर सौंळके, मराठी विभाग प्रमुख गंगाधर काळे, शारीरिक शिक्षक महेश सूर्यवंशी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल रणजीत बोराडे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रंथालय व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील या पुस्तकाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. हारी महामुनी यांच्या या कार्याचे सर्वांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
