तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील  शहरात मंगळवारी (दि. 21) धक्कादायक घटना समोर आली. शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील हनुमान नगर परिसरात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मृतदेह 20 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आढळून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 45 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मृत व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या पट्ट्यांचा शर्ट असून तो अंडरपॅन्टवरच असल्याचे दिसून आले. मात्र, मृतदेहाजवळ कोणतीही ओळख पटविणारी कागदपत्रे किंवा वस्तू आढळून आलेली नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

सदर व्यक्तीचा मृत्यू अपघाती आहे की घातपातातून झाला आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top