तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब त्रिंबक गोरे यांचा सेवानिवृत्ती बद्दल आपसिंगा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे युवा नेते अमीर भाई शेख, माजी सरपंच हिराचंद पाटील,रामभाऊ जमदाडे,माजी उपसरपंच दीपक सोनवणे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश स्वामी,महेश गोरे, शितल गोरे,बापु वडगावकर, विजय अंबुसे, यांच्यासह नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
