तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी महाविद्यालय येथे संजीवनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

संतोष लोखंडे (माजीअध्यक्ष , रोटरी क्लब तुळजापूर), श्रीकांत कदम (जिल्हा उपाध्यक्ष, पत्रकार संघ धाराशिव), संजय खुरुद (ज्येष्ठ पत्रकार), सिद्राम तट्टे (सरव्यवस्थापक, संजीवनी स्पर्धा परीक्षा केंद्र) यांच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली.

 तालुकास्तरीय इयत्ता 4 थी ते 7 वी गट- समर राऊत, श्लोक मलकुनायक, प्राची पाटील, श्लोक पवार, आदिती कुलकर्णी, तुषार वट्टे, इयत्ता 8 वी ते 10 वी गट- प्रेरणा पाटील, श्रावणी पाटील, प्राची कोलार, जिल्हास्तरावर- श्रावणी कोलार, ऋतुजा जगताप, तेजस पवार, दुर्गेश देशमुख, एमपीएससीच्या धर्तीवर घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत- हर्षवर्धन बागल  प्रथम, सोहम दुनाखे  द्वितीय, सिद्धी मंडगे, श्रुती मुकुटराव  तृतीय. ‌‘या कार्यक्रमात सिद्राम तट्टे, संतोष लोखंडे  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top