भुम (प्रतिनिधी)- शिव बसवेश्वर जयंती निमित माझा प्रभाग - माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य घेऊन नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवकांनी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबार घेतला. समस्या जाणून घेतल्या त्या अल्पावधीत निराकरण करणार असल्याचा विश्वास बांधकाम सभापती नगरसेवक अनिल शेंडगे यांनी दिला .
रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी शिव बसवेश्वर जयंती सर्वत्र साजरी झाली . या निमित्ताने भूम नगर पालिकेचे जनशक्ती नगर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक बांधकाम सभापती अनिल नामदेव शेंडगे व नुरजहा महमद ईसाक मणियार यांच्या पुढाकाराने शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच माझा प्रभाग - माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य घेऊन पहिला जनता दरबार घेतला, या दरबारामध्ये नागरिकांनी अक्षरशः पाऊस पडल्यासारख्या समस्या लेखी स्वरुपात सादर केल्या, प्रत्येक तक्रारीला अनुसरून त्या अल्पावधीतच मार्गी लागतील असा विश्वास दोन्ही नगरसेवकांनी सर्वांच्या समक्ष मतदारांना दिला .
याच दरम्यान नगरसेवक शेंडगे यांनी विरोधकावर आरोप प्रत्यारोपाचा भडीमार करताना विरोधकांनी त्यांच्या काळात वेगवेगळ्या कामासाठी गुत्तेदार पोसण्याची फक्त भूमिका घेतली, समस्या सोडवण्याच्या नावाने ठणठणाट आहे, म्हणूनच आज समस्या उघडपणे मतदार मांडत आहेत, दहा दहा लाख शौचालयावर खर्च केल्याच दाखवल प्रत्यक्षात स्वच्छता नाही, माहिती मागितली तर देत नसल्याचा आरोप केला .
यावेळी नागरिकांनी सकाळच्या दरम्यानची घंटागाडी, नाली स्वच्छता, अंडरग्राउंड नाली, अडचणीच्या झाडांच्या फांद्या, कॉक्रीट रस्ता, भाजीपाला विक्रीचा प्रश्न, शौचालय, टॉयलेट स्वच्छता, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, आठवडी बाजारात उघड्यावर शौचास बसतात , दुर्गधी होते , व्यापारी बांधवांना त्रास होत आहे . खेळाचे मैदान. ठिक ठिकाणचे धोकादायक पेवर ब्लॉक रस्ते, ठिकठिकाणी प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, घरकुल प्रश्न, बंद पडलेल्या पोलवरील लाईट अशा अनेक प्रश्नांचा भडीमार नागरिकांनी केलेला दिसून आला .
दरम्यान प्रत्येक नागरिकांची समस्या जाणून घेतल्या . याशिवाय जनतेच्या विकासात्मक प्रश्ना संदर्भात घेतलेल्या ठरावाच्या ही अनुषंगाने पुढील जनता दरबारामध्ये या सर्व समस्या मार्गी लागलेल्या दिसतील असा ठामपणे विश्वास सर्वाना दिला, यावेळी नागरिकांनी पहिल्यांदाच जनता दरबार घेतल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्तही केले, यावेळी महिलांची देखील मोठी उपस्थिती दिसून आली . पहिल्या जनता दरबारामध्ये नगरसेवक यशवंतराजे थोरात, अनिस शेंडगे, नूरजहा मनियार विठ्ठल बागडे, चंद्रमणी गायकवाड, रूपेश शेंडगे, तसेच दिलीप शाळू महाराज, केशव दाते , इसाक बागवान, नामदेव शेंडगे, शंकर खामकर आधीही उपस्थिती होती .
