भुम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (पा), ता. भूम, जि. धाराशिव येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन उत्साहात पार पडले. या वेळी पालक, ग्रामस्थ तसेच शिक्षकवर्ग यांची लक्षणीय उपस्थिती होती. 

नवीन समितीच्या अध्यक्षपदी श्री. आण्णा मारोती महानवर यांची तर उपाध्यक्षा म्हणून श्रीमती सोनाली समाधान यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी समितीतील इतर सदस्यांची निवड ही एकमताने करण्यात आली. बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत, शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छता, पोषण आहार, तसेच उपस्थिती वाढविणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

तसेच निपुण भारत अभियान, डिजिटल शिक्षणाचा वापर, ग्रंथालय विकास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेशी सतत संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.मुख्याध्यापक व शिक्षकांनी नवीन समितीचे स्वागत करून शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. ग्रामस्थांनीही नव्या समितीकडून शाळेच्या उन्नतीसाठी प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला.बैठकीस शिवहारी महानवर, मधुकर महानवर, मारुती महानवर, शिवदास लोकरे, कोंडीबा कांबळे, अर्जुन महानवर, महावीर यादव, प्रकाश यादव, प्रकाश महानवर, नितीन महानवर, यादव समाधान, राहुल महानवर,काजल महानवर, स्वाती महानवर, रोहिणी हाळनोर, जोत्स्ना लोकरे, उषा कांबळे, शीतल महानवर, मोहिनी यादव, ज्योती महानवर, मंजुषा शिंदे, प्रियंका उबाळे, सीता महानवर, पूजा कांबळे, नभा महानवर, सोनाली यादव, बाळासाहेब खरात, प्रियंका खरात, सतीश कांबळे, आरुणा कांबळे, शरद खरात, पल्लवी महानवर, मनिषा यादव इत्यादी माता पालक व पिता पालक उपस्थित होते.बैठकीचे संयोजन मुख्याध्यापक श्री. पोतरे माधव सर यांनी केले व आभार प्रदर्शन सहशिक्षिका श्रीम. पोतरे मॅडम यांनी केले.

 
Top