तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त हरीनामाच्या गजराने तेरनगरी दुमदुमली गेली आहे.

एकादशीच्या पहाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील,तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मल्हार पाटील, श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे, दत्तात्रय मुळे, उषाताई मुळे व प्रशांत वाघ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.यावेळी हभप रघुनंदन महाराज पुजारी,निरीक्षक अतुल नळणीकर,पद्माकर फंड, धनंजय पुजारी,हभप विजय महाराज डक,डॉ गुरूप्रसाद चिवटे,नवनाथ नाईकवाडी,विठ्ठल लामतुरे, साहेबराव डक,नवनाथ पांचाळ, अजित कदम, किशोर काळे , राहुल गायकवाड,अशिष माळी, राजाभाऊ आंधळे,संजय इंगळे, व्यंकट माळी, पांडुरंग बगाडे,नामदेव कांबळे, कांचन इंगळे,राजकुमार थोडसरे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


ग्रामप्रदक्षणेमुळे परीसर दुमदुमून गेला

श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणांहून आलेल्या दिंडयांची एकादशीमुळे ग्रामप्रदक्षणा झाली.यावेळी हरीनामाच्या गजराने तेरनगरी दुमदुमली गेली.


पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी

श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त एकादशी निमित्ताने महापूजा असते त्यामुळे भाविक भक्त यांनी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.


खजूर व पाण्याच्या बाटलीचे वाटप

तेर येथील रचना कंनट्रक्शन कंपनी लि.यांच्या वतीने भाविकभक्त यांना खजूर  व पाण्याचे बाटलीचे वाटप करण्यात आले.याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील व युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


आ. पाटील यांच्या वतीने ताकाचे 

श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त भाविकभक्त यांना आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने 5 हजार लिटर ताकाचे वाटप करण्यात आले.याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील व युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


रणसम्राट ग्रूपच्या वतीने केळी वाटप

श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त तेर येथील रणसम्राट ग्रूपच्या वतीने भाविकभक्त यांना केळी फळाचे वाटप करण्यात आले.याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील व  युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.          


मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

 
Top