धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे विविध उपक्रमांनी समृद्ध असा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान होते. प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी लाकाळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उज्वला गवळी, उपअधिष्ठाता डॉ. एस. ए. मुंडेवाडी, तसेच डॉ. सचिन देशमुख, डॉ. भास्कर साबळे आणि अधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व फ्लेक्सचे अनावरण करून करण्यात आली. यानंतर प्रा. देवदत्त (एम.एस्सी. फिजिक्स, बी.एड.) यांनी प्रमुख व्याख्यान देत आंबेडकरांच्या विचारांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उपयुक्तता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच समाजसेवेची जाणीव जोपासावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन तसेच विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेले पथनाट्य विशेष ठरले. पथनाट्याद्वारे संविधानातील मूल्ये प्रभावीपणे मांडत सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. या सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी अब्दुल लतीफा (सोशल वर्कर व मेंबर), डॉ नलावडे, डॉ महेश पाटील, रवी सुरवसे (प्राचार्य), शाम माळी, शुभदा तांबे, शेळकीकर तसेच मान्यवरांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सिद्धार्थ जानराव, अंकिज सवाई, विठ्ठल कांबळे, नवनाथ सरवदे, महादेव शिनगारे तसेच श्री गणेश चव्हाण आनंद, अमृत कुंभार,जयंती समिती सदस्यांनी आणि स्मार्ट कर्मचारी विशेष परिश्रम घेतले.
