तेर (प्रतिनिधी)- स्वच्छता हीच सेवा,सेवा हिच भक्ती हा उपक्रम तेर येथील श्री संत गोरोबा काका व कालेश्वर यांच्या मंदिरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी 11 एप्रिलला मध्यरात्री राबविला.

श्री संत गोरोबा काका मंदिर व कालेश्वर मंदिर पाण्याने स्वच्छ धुऊन काढण्यात आले.यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, भास्कर माळी, विठ्ठल लामतुरे, अशोक अंबाड,खंडू शिरगिरे, सतिष थोडसरे, नवनाथ साळुंके,विवेकानंद नाईकवाडी,रवि सरवदे,प्रा.नयना वाघ, प्रिती कदम,विद्या माने, धनश्री ताड,उषा सजे,माधुरी गरड, मनिषा केंद्रे,अक्षता हाजगुडे,जयदेवी शिराळ, पौर्णिमा झाडे आदी उपस्थित होते.


 
Top