परंडा(प्रतिनिधी)- गुरु-शिष्य परंपरेचे सुंदर उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले, जेव्हा शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व असलेले गुरुवर्य डॉ.अशोक मोहेकर यांच्या यशस्वी परदेश दौऱ्यानंतर त्यांचे शिष्य डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी त्यांचा मनापासून सत्कार केला.
शिक्षण महर्षी गुरुवर्य ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंबचे माजी प्राचार्य तसेच ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा या संस्थेचे सचिव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, धाराशिवचे माजी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ.
अशोक मोहेकर हे गेल्या काही महिन्यांपासून सपत्नीक परदेश दौऱ्यावर होते. या कालावधीत त्यांनी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांचा अभ्यास करून आपला दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला.
या यशस्वी परदेश दौऱ्यानंतर त्यांचे शिष्य व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी कळंब येथे जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी त्यांनी डॉ.अशोक दादा मोहेकर यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.तर गुरुवर्य डॉ.मोहेकर यांनीही आपल्या शिष्याचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले व भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली.
या सत्कार समारंभाला डॉ.विद्याधर नलवडे यांचीही उपस्थिती लाभली.सत्कार समारंभाचा कार्यक्रम अतिशय साध्या पण उत्साही वातावरणात पार पडला.
गुरु-शिष्य नात्याची परंपरा जपणारा हा प्रसंग सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला.
