परंडा (प्रतिनिधी)- अखंड वैदिक नाम यज्ञ सोहळा महादेव मंदिर,मुंगाव ता.परंडा जि.धाराशिव येथे भगवान महादेवांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यात विविध भागातून आलेल्या कीर्तनकार,प्रवचनकार व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.अखंड नामस्मरण, भजन,कीर्तन व धार्मिक विधींमुळे परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष  प्रविण रणबागुल कुर्डूवाडी चे माणिकराजे श्रीरामे पृथ्वीराज पाटील, वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के भैय्यासाहेब जानकर गोरक्षनाथ खरड पप्पू चोरमले प्राणजीत गवंडी उपस्थीत होते.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेले नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन व प्रवचने भाविकांना मंत्रमुग्ध करून गेले.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.  यावेळी हभप बाळासाहेब महाराज देशमुख ईट हभप अनुसयाताई पुरी मुगाव ,किर्तनकार बालाजी महाराज बोराडे परंडा सर्वांच्या कीर्तनाने प्रबोधनाने पंचक्रोशीतील भाविकांचे प्रबोधन झाले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री तुळजाभवानी मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ,भजनी मंडळ युवा नेते संतोष हिवरे यांच्या सहकार्याने करण्यात आले.सर्वांच्या सहभागामुळे हा सोहळा अत्यंत सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला हा भक्तीमय किर्तनकारांच्या प्रवचणाचा हजारो भावीकांनी लाभ घेतला.

 
Top