भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा सन 2025 या परीक्षेत पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला ईट येथील इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
ईट येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला शाळेने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या शाळेच्या घवघवीत यश संपादीत केले आहे . शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 12 हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात एकूण 48000 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी शुक्रवारी निकाल जाहिर करण्यात आला यामध्ये 12 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. याबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या मधील काही विद्यार्थीनी जिल्हयाच्या गुणवत्ता यादी मध्ये हि आपला ठसा उमठिवला आहे.
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यामध्ये विराज सतीश हुंबे, कृष्णा जालिंदर शिन्दे, शिवराज समाधान डोके, साईराज शिवाजी , मार्कड संस्कृती सुभाष , समर्थ सतीश देशमाने, विराग विश्वास गपाट, रोहित उमाकांत तमंचे, अनुष्का उमेश टेकाळे, प्रणिता बाळासाहेब डोंबाळे, अक्षरा लक्ष्मीकांत वालेकर, श्रावणी सुनील वाघुंबरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांना लक्ष्मीकांत चव्हाण, नागनाथ बोडके, अश्विनी चेडे, आदी या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक जयराम कचरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल हुंबे, उपाध्यक्ष सह शालेय समिती चे सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.