तुळजापूर (प्रतिनिधी)-  समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या पुढाकारातून स्वाधार मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना पक्वान्नांचे भोजन देण्यात आले.

या उपक्रमाला धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी तुळजापूर उपतालुकाप्रमुख शहाजी हाक्के, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, संजय लोंढे, संभाजी नेपते, बाळू भैय्ये, कुबेर मिटकरी, वाहेद शेख यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी अशा सामाजिक उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश देण्याची गरज अधोरेखित केली. विशेषतः मतिमंद विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवून त्यांना प्रेम आणि आपुलकी देणे हीच खरी समाजसेवा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. हा उपक्रम केवळ भोजनदानापुरता मर्यादित न राहता, माणुसकी जपणारा आणि समाजात संवेदनशीलता वाढवणारा ठरला. अशा उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांबद्दलची जाणीव अधिक बळकट होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 
Top