भूम (प्रतिनिधी)- विरोधकांना जनतेच्या विकासाचे किंवा जनहिताचे काही देणे घेणे नाही. ते जनतेला फसवून जनतेला खोटेनाटे बोलून निवडून येण्यात यशस्वी झाले आहेत. निवडून आल्यानंतरही त्यांचा तोच धंदा जोरात चालू आहे. मात्र मला जनतेने जनसेवेसाठी निवडून दिलेले आहे त्यांच्यासाठी मी विकास कामांना आडवे येणार आमचा कायम विरोधच करणार असे भूमनगरपालिकेच्या नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी म्हटले. त्या नगरपालिका सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.
यावेळी माजी गटनेते संजय गाढवे, गटनेते सुरज गाढवे, नगरसेवक अभिजीत शेटे, ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष सुधीर देशमुख, माळी महा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी माळी,अख्तर जमादार, सुनील थोरात हे हजर होते. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तसेच माजी गटनेते यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात खोटे नाते आरोप केले जात आहेत. त्यांना यावेळी सडेतोड उत्तर नगराध्यक्ष गाढवे यांनी दिले.
पुढे त्या म्हणाल्या की, जनशक्तीचे नगरसेवक जनसेवा करत आहोत असे सांगतात मग ती जनसेवा कामे बंद पाडण्याची आहे काय असा परखड सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. सभागृहांमध्ये हे काम बंद करा ते काम बंद करा अशी भूमिका हे नगरसेवक घेतात. आणि तेच सभागृहाच्या बाहेर जाऊन विकास कामे होत नाहीत असा गवगवा करतात. विरोधकांना भूम नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष कायम भ्रष्टाचारी दिसतात. विरोधक फक्त शहराची बदनामी करण्याचे काम करीत आहेत असे संयोगिता गाढवे यांनी सांगितले.
