धाराशिव (प्रतिनिधी)-  नगर परिषद हद्दीतील 12 मीटर रुंदीचा जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा रस्ता जिल्हा परिषद प्रशासनाने तारेचे कुंपन घालुन बंद केला होता. नागरिकांच्या मागणीनुसार हा रस्ता पुर्ववत खुला करावा. यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यावेळी रस्ता खुला केला. परंतू पुन्हा रस्ता बंद करून नागरिकांची गैरसोय करण्यात आली. यामुळे हा रस्ता खुला करण्यात आला आहे अशी माहिती शिवसेनेच्या वतीने दिली आहे.

मार्च महिन्याच्या 25 तारखेला अचानक समता नगर ते पंचायत समितीकडे जाणारा नियमीत रहदारीचा रस्ता बंद करण्यात आला. यामागे नेमक कारण काय याची माहिती घेतली असता जिल्हा परिषद प्रशासन यांनी ही कार्यवाही केल्याचे दिसून आले. 27.मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने केली होती. त्यावर हा रस्ता तातडीने खुला करण्यात आलेला होता. 22 एप्रिल रोजी अंधारामध्ये हा रस्ता पुन्हा बंद करण्यात आलेला होता. रस्ता बंद केल्यामुळे हजारो नागरीकांची, जेष्ठ नागरीकांची गैरसोय होत होती. रस्त्यावरुन नागरीकांना दवाखाने, शासकीय कार्यालये, बँका इत्यादी ठिकाणी जाणे येण्यासाठी नागरीकांना सोईचा आहे. गेल्या 50 वर्षापासून या रस्त्यावरुन नागरीक ये- जा करतात. याच रस्त्यासाठी प्रशासनाकडुन एक कोटी 30 हजार रुपये मंजुर करण्यात आले आहेत. असे असताना देखील रस्ता वारंवार बंद करण्याचा हेतु काय, कोणाच्या दबावामुळे रस्ता जिल्हा परिषद प्रशासन बंद करत आहे, सर्वसामान्य नागरीक, जेष्ठ नागरीक यांची गैरसोय करण्याचा नेमका हेतु काय हे न समजणारे आहे. परंतु ज्या-ज्या वेळी रस्ता जिल्हा परिषद प्रशासन बंद करेल त्या-त्या वेळी शिवसेना स्टाईलने रस्ता नागरीकांसाठी खुला करण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक नाना घाडगे, पंकज पाटील, अमित उंबरे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, मनोज उंबरे, सागर मोरे यांच्यासह स्थानिक नागरीक उपस्थित होते.

 
Top