तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांच्या कार्याची दखल घेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांना प्रतिष्ठेची डॉक्टरेट ऑफ सायन्स (डी.एस्सी.) पदवी बहाल केली आहे.
चंद्रकांत घोडके यांच्या शैक्षणिक कार्याची शिफारस ‘डॉ. एस. राधाकृष्णन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’ (ऑल इंडिया टीचर्स वेल्फेअर असोसिएशन) यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेची आणि शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण आहे. या यशाबद्दल धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच तहसीलदार व प्रशासन व्यवस्थापक माया माने यांच्या हस्ते घोडके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
