धाराशिव (प्रतिनिधी)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे 150 वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह‌’ 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या सप्ताहानिमित्त जिल्हाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे आणि विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने 13 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या रक्तदान शिबिरात सहायक आयुक्त समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी,तसेच विविध महामंडळातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.यामध्ये जितेंद्र डोंगरे,राहूल पेंढारकर,विवेक गायकवाड,श्रीकृष्ण मोटे,सिद्धार्थ ओव्हाळ,कृष्णा गायकवाड,संदीप पाटील,अक्षय गंगावणे,लक्ष्मण क्षिरसागर,भगवंत कपाळे,आदटराव लक्ष्मण,रतनराव भोसले आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमास सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने आदी उपस्थित होते. सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित अशा उपक्रमांमुळे समाजात सामाजिक ऐक्य,बंधुता आणि मानवतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

 
Top