धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामार्फत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून सलग 18 तास वाचन हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ छाया दापके यांनी वरील प्रतिपादन केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, शिक्षणक्षेत्रात एक सतत जाणवत आहे की, वाचन कमी पडले की माणूस मागे पडतो. जरी आपण डीजिटल युगात वावरत असलो तरी,या युगाची सुरुवात देखील मुळात ग्रंथाच्या माध्यमातूनच झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला जो मुल मंत्र दिला,शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा,हा संघर्ष देखील पुस्तकांच्या माध्यमातून च सुरू होतोय. पुस्तक वाचल्यानंतर माणसाचा मेंदू परीपक्व होतो आणि मग माणसाला चांगल्या वाईट गोष्टीची अनुभूती येते. अनुभूती मधुन ज्ञान वृद्धिंगत होते. मरेपर्यंत विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ सोडू नये असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.
यावेळी वाचनाच्या प्रथम सत्राची सुरुवात सकाळी 6 ते दुपारी 12 झाली यामध्ये 106 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. द्वितीय सत्र 12:30 ते 6:30 या वेळेत सुरू झाले. यामध्ये 92 विद्यार्थी सहभागी झाले. तर तृतीय सत्राची सुरुवात सायंकाळी 6:30 ते रात्री 11:30 या वेळेत झाली. या मध्ये 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ मदनसिंह गोलवाल यांनी केले. यावेळी प्रा माधव उगिले, प्रा विवेकानंद चव्हाण, प्रा सरवदे, ग्रंथालय कर्मचारी अल्ताप अतार, शिवराज राजेगोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार डॉ निल नागभिडे यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
