भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर (ढगे) शिवारात रस्त्यालगत असलेल्या शेतात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडबा सुभाष कसबे (वय 42, रा. चिंचपूर (ढगे), ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर घटना दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजण्यापूर्वी वालवड रोडलगत सिताबाई गोविंद जाधव यांच्या शेतात घडली. संबंधित इसम शेताजवळ मृत अवस्थेत पडलेला आढळून आला. याबाबत चत्रभूज पांडुरंग कसबे (वय 38, रा. चिंचपूर (ढगे), ता. भूम) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोस्टे भूम येथे आम्र ( Accidental Death Report ) क्रमांक 14/2026, कलम 194 BNSS 2023 अन्वये दि. 18 एप्रिल रोजी सकाळी 11.17 वाजता करण्यात आली. सदर प्रकरणाची नोंद पोलीस हवालदार पाटील यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.


 
Top