धाराशिव (प्रतिनिधी)- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने महात्मा फुले चौक येथे फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त (द्विशताब्दी वर्ष) संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले. गाव व शहरांमध्ये फेऱ्या काढून फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यात येणार असून निबंध, वक्तृत्व, एकपात्री नाट्य, कविता वाचन तसेच फुले लिखित साहित्याचे अखंड वाचन अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले व फुले यांच्या जीवनावर आधारित भित्तिपत्रक, चित्रकला व रील स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. यासोबतच रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, समतेच्या विचारांवर आधारित नाट्यप्रयोग, सत्यशोधक विवाह सोहळे तसेच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. कवी संमेलन व परिसंवादाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम वर्षभर राबवून ग्रामीण व शहरी भागात समतेचा विचार पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत, जिल्हाप्रमुख बिभीषण खुणे, भूम तालुकाध्यक्ष संतोष डोरले, धाराशिव तालुकाध्यक्ष व्यंकट जाधव, परंडा तालुकाध्यक्ष सुरेंद्र भोजने यांच्यासह सरपंच महालिंग राऊत, राजाभाऊ तळेकर, दादा कारकर, भारत जाधव, शांतीलाल वाघे, माजी सरपंच विष्णू इतापे, अनुदेव मारकड, सुनील भोसले, सुरेंद्र भोसले, आशिष माने, गोरख खुणे, राजेंद्र जाधव, गौतम वाघमारे, सरपंच मेत्रे, बालाजी गोरे, दगडू रामचंद्र मदने, देवानंद विठ्ठल रूपदास, मोहन काकडे, तुषार जाधव, अनिल जाधव, नंदकिशोर कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
