धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शाहूनगर येथील जेतवन कॉलनी येथे क्रांतीसुर्य म. फुले यांची 199वी जयंती मोठ्या ऊत्सा उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून धाराशिव नगर परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत काकडे हे उपस्थित होते .यावेळी शाहूनगर जेतवन कॉलनीतील प्रा.महेंद्र चंदनशिवे ,अशोक हजारे, राम राऊत, सचिन दादा शिंगाडे . वाघमारे अनंत, वाघमारे नाना ,प्रा. भालेराव , रमाकांत गायकवाड ,सुबोध शिंगाडे ,अमित शिंगाडे ,सुमित चंदनशिवे, सिद्धांत राऊत, बाळासाहेब माने,रोहन शिंगाडे,अनंत घाडगे,मेजर वाघमारे मोहन,सिरसाट,हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्राध्यापक राम चंदनशिवे यांनी केले महात्मा फुले यांच्या द्विषताब्दी जयंतीमोहस्तव वर्षभर विविध कार्यक्रमाने साजरा केलाजाणार असे सचिनदादा शिंगाडे यांनी सांगितले.
