धाराशिव (प्रतिनिधी)- जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव जंगम मठ ट्रस्ट, धाराशिव यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आपल्या परंपरांचा सन्मान राखत, पारंपरिक पद्धतींचे अनुकरण करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बसवेश्वर महाराज चौक व वीरशैव जंगम मठ ट्रस्ट येथे महाराजांच्या मूर्तीचे पूजन डॉ. अनंत राजमणे, श्री. सोमेश्वर पाळणे, श्री. उमेश जोशी तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी मठामध्ये सर्व भगिनी व बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.
मिरवणूक मार्ग :
वीरशैव जंगम मठ, नेहरू चौक, काळा मारुती चौक, यमाई मंदिर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इच्छापूर्ती महारुद्र हनुमान चौक, समता नगर, आनंद नगर, रामनगर, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज चौक (समारोप). मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मोठ्या उत्साहात पार पडली. तुतारीच्या गजरात तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक-युवतींमुळे वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मिरवणूक दिमाखदार ठरली.
महिला सहभाग
स्नेहल पाळणे, पद्मावती चपणे, सुलेशा चपणे, अनुराधा तोडकरी, अंजली चपणे, आशा पाटील, तनया पाळणे, त्रिशा पाळणे, रुद्रा पाळणे, चित्रा पाळणे, अर्पिता पाळणे, सोनी पाळणे, अनिता गुळवे, वैष्णवी गुळवे, शिवगंगा गुळवे, जयश्री झाडे, संजीवनी ढोले, कांचन ढोले, कीर्ती ढोले, ईश्वरी पाळणे, सुनंदा पाळणे
पुरुष सहभाग
सोमेश्वर पाळणे, संजय वैजनाथ गुळवे, संजय पाळणे, राजाभाऊ दिवटे, रमेश ढोले, महेश ढोले, महेश मैरान, नागपूरे अण्णा, गोपाळ केसकर, सोमनाथ बेलूरे, भाऊसाहेब बेलूरे, उमेश जोशी, बसवेश्वर पाळणे, अनिल मैरान, अजित शिंगणापूरे, श्रीकांत साखरे, अर्जुन साखरे, शिरीश गिरवलकर, मल्लिकार्जुन आपचे, समाधान भोरे, अजय शेटे, सुनील शेरखाने, सुहास तानवडे, अशोक पाळणे, रवी कोरे, राजाभाऊ माळी, ज्ञानेश्वर जावळे, चेतन माशाळकर, सुशील पाळणे, विशाल साखरे, संदीप पाळणे, गाजरे सर, कल्पेश गाढवे, आरुष गाढवे, पांडुरंग भोकरे, प्रथमेश पाळणे
बसवेश्वर महाराज चौक येथे रात्री 9 वाजता सर्वांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजातील एकता, समता व बंधुभाव यांचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री. गिरीश महाबळेश्वर पाळणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच उपाध्यक्ष ॲड. शिवयोगी विश्वेश्वर चपणे, श्री. अक्षय अशोक पाळणे व श्री. प्रथमेश राजेश्वर पाळणे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सर्व समाजबांधवांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
तसेच संबंधित शाखा अभियंता व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनियमिततेशी संबंधित रकमेची वसुली करून ती शासन तिजोरीत जमा करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिराढोण ग्रामपंचायत प्रशासनात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, स्थानिक पातळीवर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

