धाराशिव (प्रतिनिधी)-  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32 व्या  अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र दिले.

दिनांक 29 व 30 मे 2026 रोजी लोकनेते अजितदादा साहित्य नगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात धाराशिव येथे हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनास देशभरातून 900 साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. मानदेशी ग्रामीण शब्दशैलीतील त्यांचे दौशाड हे आत्मकथन प्रचंड लोकप्रिय झाले आहे. कंजाळ, बिलिंगा, काडकुसुंबा, हराटी आदी ग्रंथांचे विपूल लेखन राऊत यांनी केले आहे,. आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष निवडी संदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यावेळी सर्वानूमते हि निवड करण्यात आली. यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, गोरक्षनाथ भांगे, राष्ट्रीय सचिव सुर्वणा पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगळे, लीलादेवी पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील लोणकर, संतोष शेलार,प्रदेश संघटक सचिव अमोल कुंभार,मराठवाडा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पालकर,उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे,धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा.राजा जगताप, महिला जिल्हाध्यक्ष मीना महामुनी आदीजण उपस्थित होते.

 
Top