भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने भुम तहसीलदार जयवंतराव पाटील भूम यांच्या मार्फत दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी धाराशिव, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांगांना दरम्यान अडीच हजार रुपये अनुदान दिले जाते. परंतु दोन महिने झाले दिव्यांगाच्या खात्यावर पैसे जमा नसल्यामुळे दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी तत्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, सचिव रियाज पठाण, राज्य समन्वयक रामहरी चव्हाण, बापूसाहेब मुळे, विश्वनाथ माळी, दादासाहेब डंमरे, हनुमंत बोराडे,फयाज बेग,भाग्यश्री क्षिरसागर,रतन जाधव, सिंधूबाई टाळके, वैभव शेळवणे, शिवाजी शेटे, उत्तम बोटे, संतोष बोंद्रे, रमेश साठे, औदुंबर भारती, सुग्रीव शेटे समाधान भोरे, रत्नदिप चव्हाण,सागर झोंबाडे उपस्थित होते.
