कळंब (प्रतिनिधी)- येथील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर पुनर्वसन सावरगाव येथे दिनांक 24 ते 25 एप्रिल या तीन दिवशी संस्कार वर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यात इनरव्हील क्लब ऑफ क ळंब सिटी च्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता. संस्कार वर्गाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम जमाले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ ते अकरा या वेळेत करण्यात आले होते . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यायाम, योगा ,झुंबा, ड्रॉइंग , आर्ट ऑफ क्राफ्ट व स्कील अँड मोहर डेव्हलपमेंट ,गेम्स यासारखे विविध उपक्रम तज्ञ शिक्षण शिक्षकामार्फत घेण्यात आले . 

या शिबिरात पालकांसाठीही पालक तत्व या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते या सत्रात श्रीमती टोणगे यांनी यावेळी पालकांना व मुलांना संगोपनातील बदल ती भूमिका व सकारात्मक शिस्त याविषयी संवाद साधला याप्रसंगी विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला शिबिरायाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेतून प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सौ प्रतिभा भवर , सचिव दिपाली लोंढे ,प्रकल्प प्रमुख ज्योती पवार ,यांच्यासह क्लबच्या इतर सदस्य उपस्थित होत्या संस्कार आणि शिक्षण यांच्यातील संगम घडवून आणणाऱ्या सरस्वती विद्या मंदिराचे कार्य कौतुष्काच पद आहे असेही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेमधील लोंढे, कवडे, लोमटे, शिंदे, पडवळ, पठाण, घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top