तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील नारायणी महिला जिल्हा सहकारी पतसंस्था शाखेस तुळजापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी जागामालक तथा संस्थेचे मार्गदर्शक राहुलजी साळुंखे उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक अरुण श्रीमंत पवार व जयपाल शेरखाने यांनी उपनगराध्यक्ष रोचकरी यांचा यथोचित सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाखाधिकारी गजानन वैद्य, बामणे, कॅशियर विकास जाधव तसेच संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. नारायणी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी होत असलेल्या कार्याचे उपनगराध्यक्ष रोचकरी यांनी विशेष कौतुक केले.