तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात आमदारानंतर सर्वाधिक प्रभावी मानली जाणारी दोन पदे म्हणजे पंचायत समिती सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती. या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर सावरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नेत्यांची निवड झाल्याने तुळजापूर तालुक्यात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सावरगाव येथील संतोष बोबडे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूरच्या सभापतीपदी निवड केली. त्याचबरोबर का टी गावचे विक्रमसिंह देशमुख यांची पंचायत समिती सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्यांमुळे सावरगाव जिल्हा परिषद मतदारसंघाला विशेष प्राधान्य दिल्याची चर्चा रंगली आहे.  

यापूर्वी तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातील नेत्यांचेच वर्चस्व विविध महत्त्वाच्या पदांवर दिसत होते. मात्र राज्य व देशातील सत्तांतरानंतर स्थानिक राजकारणातही बदलाचे वारे वाहू लागले असून, सत्ताकेंद्र आता अणदूरकडून सावरगाव मतदारसंघाकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे पंचायत समिती सभापती विक्रम देशमुख आमदार राणा पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत तर नूतन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष बोबडे हे पूर्वी काँग्रेस मधून भाजपात आलेले आहे यापूर्वी त्यांनी  पंचायत समिती सभापती पदा  वर काम केलेले आहे 

सावरगाव व काटी  या गावांतील नेत्यांना प्रमुख पदांवर संधी देण्यामागे नेमके राजकीय गणित काय, यावर विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या बदलामुळे सावरगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्यांन मधुन  व्यक्त करत आहेत. अणदूरप्रमाणेच आता सावरगाव परिसरातही विकासकामांचा वेग वाढेल, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. एकूणच, या नियुक्त्यांमुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, आगामी काळात याचे परिणाम अधिक ठळकपणे जाणवणार आहेत.


 
Top