तुळजापूर (प्रतिनिधी)- बोगस खतनिर्मिती कारखान्याची बातमी का लावतोस म्हणून जिवे मारण्याची धमकी प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार सर्जेराव गायकवाड यांनी निवेदन देऊन केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायजर व महीन्द्रा कार्प सायन्सेस या दोन नावाने एकच बोगस खतनिर्मिती व विक्रीचा कारखाना असुन आगस्ट,/ सप्टेंबर 2025 मध्ये मी पत्रकारीतेच्या माध्यमातून आवाज उठवला व शेतकऱ्यांची लुबाडणूक करणारा तो कारखाना बोगस खत असल्याचे निष्पन्न झाले व तो बंद करण्यात आला. त्याचा परवानाही रद्द करण्यात आला होता. परंतु अधुन मधुन रात्री अपरात्री व दिवसा कारखाना उघडला जात होता व माल लंपास केला जात असल्याचे संबंधित वरीष्ठ अधिकारी यांना कळवलेही होते. दि.01 एप्रिल 2026 रोजी दु. 1 ते 2 वा. दरम्यान कारखान्याचे शटर उघडुन गाडी भरत असल्याचे निदर्शनास आले. मी व्हिडिओ चित्रीकरण केले व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना कल्पना देऊन माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली. बातमी प्रसिद्ध करताच संबंधितांनी दु 4.35 वा.फोन करुन बातमी का दिली म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. 

 
Top