मुरूम (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रमामध्ये संशोधन प्रकल्प, फिल्ड प्रोजेक्ट, ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप याचा समावेश केला आहे. पदवी आणि पदवीधर वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा योग्य वापर करता यावा. आणि त्या नुसार त्यांना उद्योग व्यवसाय किंवा करिअरची संधी मिळावी.तसेच संशोधनामध्ये गोडी निर्माण व्हावी चांगले संशोधक निर्माण व्हावी व्हावे म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण कक्ष, वाणिज्य संशोधन केंद्र, महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा  आणि पुणे येथील  इएनएसआयएन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने AI in Research Design, Creativity, Innovation and Entrepreneur: NEP 2020 activities Research Project,  Field Project, OJT/Internship या विषयावर एक दिवस राष्ट्रीय कार्यशाळा शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

 या कार्यशाळेत आयडिया थोन या संकल्पनेवर आधारित क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन स्टार्टअप टू इंटर या अंतर्गत  युवकांच्या , विद्यार्थ्यांच्या नवनवीन आयडिया चे पोस्टर/ डेमो/ मॉडेल /पोस्ट सादरीकरण स्पर्धा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांच्या हस्ते आणि भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अमोल शिवाजीराव मोरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे एखादी शेळीसाठी प्रमुख उपस्थिती मा आश्लेष भैय्या मोरे, उपाध्यक्ष मा जनार्दन साठे सरचिटणीस मा पद्माकरराव हराळकर, सचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे, सहसचिव यांची उपस्थिती आहे.

कार्यशाळेसाठी पुणे येथील पुष्कराज कंपनीचे ग्रुप ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर शैलेंद्र गोस्वामी यांचे संशोधन आणि संशोधन आराखडा यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर ब्रिज भाषण होणार आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरण आणि जागतिक युद्धाच्या संकटात उद्योजकाचे उद्योजकतेला संधी या विषयावर प्रोफेसर डॉक्टर सय्यद अझरुद्दीन प्रोफेसर कॉमर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांची दोन सेशन होणार आहेत तसेच डॉक्टर शैलेश वादेर डायरेक्टर इन्फॉर्मेशन अँड लिंकेजेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी तसेच प्रोफेसर शिवकुमार दिनी दिने सेंट्रल युनिव्हर्सिटी कर्नाटक यांचे मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यशाळेत पोस्टर्स स्पर्धेसाठी युवक, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड तर संशोधक विद्यार्थ्यांसाठी रिसर्च स्कॉलर इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेसाठी रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  तरी या कार्यशाळेस प्राध्यापक,  पदवी आणि पदव्युत्तर आजी  आणि माजी विद्यार्थी तसेच संशोधन केंद्रातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले आणि संयोजन समितीने केले आहे. 

 
Top