धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीने ओबीसी घटकांची फरफट चालविली आहे. निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळी 46 महामंडळे काढली. परंतू, त्यासाठी अध्यक्षांचा पत्ता नाही, ऑफिसचा पत्ता नाही आणि निधीचा देखील पत्ता नाही. अहिल्यादेवी होळकर यांना एका बाजूला धर्मरक्षणी म्हणायचं आणि अहिल्यादेवींनी 1771 मध्ये बांधलेला मनकर्णिका घाट बुलडोजर लावून पाडायचा असे धोरण भाजपचे आहे. धनगर आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू असताना आंदोलन स्थळी भेट देत भंडारा लावून तुम्ही आम्हाला मतदान करा सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊन टाकू असे आश्वासन तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर, मी पुन्हा येईन असे म्हणत तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र आजपर्यंत दिलेले नाही. मुळात भाजपची राजनीती भेदभावावर आधारित असल्यामुळे त्यांनी ओबीसींची फरपट लावली असल्याचा घनाघाती आरोप काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांनी दि.25 एप्रिल रोजी केला.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे, प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार, मलंग शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सय्यद खलील सर, तालुकाध्यक्ष विनोद वीर, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डीसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, उमेश राजेनिंबाळकर, जावेद काझी, जिल्हा सचिव सरफराज काझी, अशोक बनसोडे, ओबीसी शहराध्यक्ष हरिदास शिंदे, युवक काँग्रेसचे संकेत पडवळ, राजुदास आडे, सुनील बडूरकर, मिलिंद गोवर्धन, तनुजा हेड्डा, अंकुश पेठे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष भिंगे म्हणाले की, ओबीसींशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसचा संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्याची सुरुवात समता भूमीपासून भिडे वाड्यात वंदन करून केले आहे. माधवराव पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर करून आज धाराशिव जिल्ह्यात आला असल्याचे सांगितले. ओबीसी समाज हा कष्टकरी असून कष्टकरी हे कधीच विषमतावादी नसतात. मात्र, संघ प्रणित भाजप ओबीसींना विषमतावादी करण्याचा क्रूर डाव करीत आहे. तसेच
भाजप हा कर्मठ हिंदू धर्मावर गाणं हे सातत्याने गायला लागला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आम्ही थेट ओबीसींच्या वस्त्यांवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहोत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली असून त्यांच्या टक्केवारीच्या प्रमाणात त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ओबीसी मध्ये राजीव गांधी चे आकर्षण पाहायला मिळत आहे. तर आमच्या संवाद यात्रेत देखील ओबीसींचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्हाला आत्मविश्वास येत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले मात्र निवडणुकीमध्ये श्रीमंत मराठ्यांनी त्याचा फायदा घेतला असे सांगत ते म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून मराठा-धनगर व मराठा-ओबीसी असे भांडणे लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात भाजप व्हायरस घुसला असून तू काढल्याशिवाय महाराष्ट्र शुद्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवाजी कोण होता ? या पुस्तकावरून आमदार गायकवाड यांनी जी वैचारिक दिवाळखोरी दाखवली, ती जातीच्या उदातीकरणातून दाखवली असल्याचे मी सांगितले. यापूर्वी कधीही वैचारिक अध्यपतन झाले नव्हते हे अध्यपतन रोखण्यासाठी सरकार विशेषता गृहमंत्री काय झोपलेत का ? तसेच फडणवीस यांनी एक तरी विकासाची योजना आणली का ? असे प्रश्न त्यांनी विचारले. मुळात भाजपचा डीएनएच विषमतावादी असून भाजपच्या काळात वैचारिक दृष्ट्या अध्यापतन झालेले आहे, यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यातच सत्तेवर निर्बुद्ध व नालायक लोक बसले असल्यामुळे जनतेनेच जोडे घेऊन त्यांच्या पाठीमागे लागले पाहिजे असे आवाहन भिंगे यांनी केले.
