कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने अक्षरशः धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. यानिमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विजयी उमेदवारांचे दि. 25 रोजी जंगी सत्कार करण्यात आला. तर यावेळी विजयी उमेदवाराकडून ही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे वरिष्ठ नेते दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अशोक शिंदे, विजेंद्र चव्हाण, संजय पाटील, अशोक तांबारे,भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामहरी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास बारकुल, भागचंद बागरेचा ,भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्ता साळुंखे ,अरुण चौधरी आधी उपस्थित होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘आई येडेश्वरी विकास पॅनल’ने 15 पैकी तब्बल 13 जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांना चारीमुंड्या चित केले.
एकतर्फी निकालाने राजकारणात खळबळ उडाली तर या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली. मात्र निकाल लागण्याआधीच भाजपच्या संघटनशक्तीची झलक दिसू लागली होती. मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत भाजपने विरोधकांना सावरायलाही वेळ दिला नाही. हा निकाल केवळ विजय नसून विरोधकांसाठी मोठा राजकीय इशारा मानला जात आहे.
आमदार पाटील यांचे अचूक नियोजन ठरले निर्णायक
गावागावांत थेट संपर्क, मतदारांशी साधलेला संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित या ‘मायक्रो प्लॅनिंग’मुळेच भाजपने हा विजय खेचून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय पकड सिद्ध केली. या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यात संचालक म्हणून उत्तमराव टेकाळे, लक्ष्मण देशमुख, शंकर यादव, अशोक जगताप, संतोष तौर, विक्रम जाधव, किशोर पाडे, अशोक ईरपतगिरे, संभाजी वरपे, संजय नानजकर, किसन जाधव,कमलाकर कसबे ,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, गंगुबाई गुंड व सामाजिक कार्यकर्ते राजश्री शिनगारे यांच्या सह आधी सत्कार करण्यात आला याप्रसंगी कळंब तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
