तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी गढूळ पाणी पाणीपुरवठा झाल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यत्क केली. सध्या तीर्थक्षेत्र तुळजापुरात उन्हाळी सुट्ट्यां पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संख्येने येत आहे. त्यातच गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने भाविकांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. यापूर्वीही शहराला गढूळ पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर नगरपालिकेने उपयोजना केलाय आता पुनश्च गढूळ पाणीपुरवठा होऊ लागल्याने या पाणीपुरवठ्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने योग्य नियोजन करून स्वच्छ पाणी कसे पुरवठा होईल, अशी उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे.
उन्हाळा सुट्टी असल्याने यापुढे भाविकांची गर्दी प्रचंड वाढणार आहे. जर त्यांना असे गढूळ पाणी मिळाले तर देवी भक्तांना त्यांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या शहराला एक दिवसाआड दोन टप्प्यात पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पाणीपुरवठा वितरणातील गोंधळ सुरू असल्याने उन्हाळ्या सुट्ट्या तरी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करणे गरजेचे बनले आहे. तुरटी सह पाणी स्वच्छ करणारी औषधे दर्जेदार वापरावेत अशी मागणी आता शहरवासीयातून होत आहेत. कारण यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्यात धुतल्या होत्या. तरीही पुनश्च गढूळ पाणी येऊ लागल्याने याबाबत नगर परिषदेने कायम तातडीने योग्य ती उपयोजना करणे गरजेचे बनले आहे.
