धाराशिव (प्रतिनिधी)- अंधश्रद्धा समाजाला त्रास देणारा रोग आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्राचार्य देशमुख म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समाजातील जुनाट, बुरसटलेल्या परंपरा नष्ट करण्यासाठी काम केले. ते म्हणतात की समाजात सतत सकारात्मक बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक माणसाने कष्ट केले पाहिजेत. श्रीमंत लोकांनी धनाचा अहंकार न बाळगता गरीब लोकांना मदत केली पाहिजे. माणसात देव शोधा ही शिकवण त्यांनी दिली. समाजात शांतता प्रस्थापित होणे आवश्यक आहे. धर्माच्या नावावर कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करु नये. असे झाले तर सामाजिक स्वास्थ्य टिकणार नाही, संतानी दिलेले वचन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विचारवंतांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून देश व राष्ट्र हीत साधले जाईल असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी डॉ बालाजी गुंड, प्रा माधव उगिले,प्रा विवेकानंद चव्हाण यांच्या सह सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
