तुळजापूर (प्रतिनिधी)- खरात सारखी कोणतीही विकृत मानसिकता सहन केली जाणार नाही. संबंधित आरोपींना जलदगती न्यायालयात नेऊन कठोरात कठोर शिक्षा देण्याचीज गरज आहे. अशा व्यक्तीला वेळ पडल्यास फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तटकरे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या बिनविरोध निवडून याव्यात, यासाठी सर्वपक्षीय सहमती साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामती शहरात शरद पवार यांनी उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्षाशी लवकरच चर्चा करणार असल्याचे सांगत तटकरे म्हणाले की, “संवेदना आणि परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसने सुनेत्राताई पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करावे, अशी आमची अपेक्षा आहे. विमान कंपनी मालकांच्या अटकेच्या मागणीवर बोलताना तटकरे यांनी सांगितले की, राज्य सरकारकडे सीबीआय आणि सीआयडी चौकशीची मागणी आधीच करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू असला तरी प्राथमिक अहवाल समाधानकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
