तुळजापूर (प्रतिनिधी)-   जय जगदंब या कॉफी टेबल पुस्तकात सरदार वल्लभभाई पटेल व निजाम यांच्या भेटीचा एक फोटो आहे. हा फोटो मराठवाडा महाराष्ट्रात हस्तांतरित होण्याचा प्रसंग असावा. त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र ठिकाणी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे. हे पुस्तक देवीचा इतिहास सांगणारे असून, प्रत्येक भक्ताच्या घरात जपून ठेवण्यासारखे आहे.  असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले.

जागतिक महत्त्व असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये लेखक श्रीकृष्ण गंगाधरराव दीक्षित लिखित ‌‘जय जगदंब‌’ या कॉफी टेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा  पार पडला. या वेळी बोलताना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले की, या ग्रंथाच्या माध्यमातून देवीची आराधना होणार आहे.” हे पुस्तक भेट देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जय जगदंब हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा बाळासाहेबांना देवीने दिली असावी असे मला वाटते. यावेळी लेखक श्रीकृष्ण दीक्षित म्हणाले कि “आमचे बालपण मंदिरात गेले. रोज ‌‘उदो-उदो‌’चा गजर ऐकत मोठा झालो. देवीच्या सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होत होतो. जुनी पदे विस्मरणात जात असल्याचे पाहून ती जतन करण्यासाठी हे पुस्तक लिहिले.

या सोहळ्यास अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण, आमदार ॲड. जया चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, डी. पी. सावंत, हनुमंतराव पाटील बटमोगरेकर,  महापौर कविता संतोष मुळे, नगराध्यक्ष विनोद गंगणे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाशनानंतर लेखक श्रीकृष्ण दीक्षित व त्यांच्या पत्नी पुष्पा दीक्षित यांचा अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 
Top