भुम (प्रतिनिधी)- ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन’ निमित्त शंकरराव पाटील महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार सर्व पदनिर्देशित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा हक्काबाबत जागरूक करण्यासाठी शपथविधी कार्यक्रम पार पडला.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी एकत्रितपणे सेवा हक्क दिनानिमित्त प्रतिज्ञा घेतली. शासकीय सेवा पारदर्शक, वेळेत व प्रामाणिकपणे नागरिकांना देण्याचा संकल्प सर्वांनी केला. तसेच सेवा वितरण प्रक्रियेत कोणताही विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देण्यात आली. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे सेवा हक्क कायद्याविषयी जागरूकता निर्माण होऊन नागरिकाभिमुख प्रशासनाची जाणीव अधिक दृढ झाली.
