धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार आहे आज मुंबई येथे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी त्यांनी अधिकृत निमंत्रण दिले. यावेळी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण हि सुनेत्राताई यांच्या हस्ते संपन्न झाले, लोकनेते अजित पवार साहित्यनगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात धाराशिव येथे दिनांक 29 व 30 मे 2026 रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. देशभरातील 900 साहित्यिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत. या अगोदर पु.ल देशपांडे,जावेद अख्तर, मृत्युंजयकार शिवाजी सावंत, रमाकांत खलप, शरद पवार, ना.धों.महानोर, आदी मान्यवरांनी या संमेलनाचे उद्घाटन केले आहे.
