धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रीय ओबीसी, बहुजन शिक्षक संघाच्यावतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक खिजर मोरवे यांना जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय ओबीसी, बहुजन शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल नाचपते व राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांनी मोरवे यांच्या आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे. मोरवे हे तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या पुरस्काराबद्दल मोरवे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
