धाराशिव (प्रतिनिधी)- मंत्री नितेश राणे यांची उंची शिवरायांएवढी असे वादग्रस्त वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र याने केले आहे. असे वक्तव्य करताना मुनीच्या जिभेला आणि त्याच्या टिल्लू एवढ्या बुद्धीला कदाचित हे भान नसेल की यामुळे मराठ्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. नितेश राणे ची काय दलाली करायची असेल ते मुनीने खुशाल करावी; पण टिल्लू एवढ्या नितेशची चक्क छत्रपती शिवरायांशी तुलना करून मुनी निलेशचंद्र याने तमाम मराठ्यांची व शिवप्रेमींची मने दुखावली आहेत.
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही याचं भान त्याने ठेवणे गरजेचे आहे. वास्तविक जैन धर्म हा अहिंसा परमो धर्म: या तत्त्वावर चालतो. पण निलेशचंद्र याने धर्माचा वापर शांततेसाठी करण्याऐवजी समाजात दुफळी निर्माण करण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला आहे, हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला घातक आहे.“
काही दिवसांपूर्वी मुनी नयन पद्मसागर याने देखील महाराणी ताराराणी या जैन होत्या असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे अशी वादग्रस्त वक्तव्ये जाणून बुजून होत असतील व दोन समाजात असणारा सलोखा नाहक जर कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे बरोबर नाही.यातून त्यांना काय साध्य करायचे आहे या दोघांनी उघड उघड सांगावे. मराठे त्यांचा चांगला समाचार घेतील. मराठ्यांनी नेहमी शिवछत्रपतींचा घालून दिलेला समतेचा आदर्श जोपासला आहे पण याचा अर्थ असा होत नाही की मराठ्यांचं रक्त थंडावलेलं आहे.
मुंबईतील दादर येथील कबुतरखाना आरोग्याच्या कारणास्तव (श्वसनाचे आजार) महानगरपालिकेने बंद केला होता. याला विरोध करताना निलेशचंद्र मुनी याने जैन समाज शांतताप्रिय आहे, पण धर्मासाठी गरज पडली तर आम्ही शस्त्रही उचलू,“ असे विधान केले होते. तसेच त्यावेळी त्याने कोर्टाच्या आदेशांचे पालन करणार नसल्याचे म्हटले होते, ज्यामुळे सामाजिक शांततेवर परिणाम झाला होता. एवढा माज आणि मस्ती चांगली नसते.त्याच मुनी निलेशचंद्र याने हे कायम लक्षात ठेवावे मराठ्यांनी भल्या भल्यांचा माज उतरवलेला आहे. असा इशारा ॲड संजय भोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
