धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही.पी.एज्युकेशनल कॅम्पस छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी वक्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेतला. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून केलेले कार्य, सामाजिक समता आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण होऊन डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संदेश देण्यात आला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, बी.एड.महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, जय हिंद जुनियर कॉलेजच्या प्राचार्या अंजुम शेख, संकुलाचे लेखापाल प्रा.योगेश मंडलिक, तसेच कॅम्पस मधील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top