उमरगा (प्रतिनिधी)-  विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (दि 14) शहरातील शाळा महाविद्यालय, व नगर पालिके समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर भीम जयंती उत्सव  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

शहरातील पालिकेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मंगळवारी सकाळपासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, राजकीय पक्ष, संघटना, आंबेडकर अनुयायी बहुजन बांधवांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रारंभी जिपच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवाड, उपाध्यक्ष विजय वाघमारे, पंचायत समितीच्या सभापती ॲड. आकांक्षा चौगुले यांनी अभिवादन केले. यावेळी पंचशील ध्वजाचे रोहण बालाजी सुरवसे तर निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण राहुल सरपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक बुध्द वंदना, पंचशील घेण्यात आले. समता सैनिक दलाच्यावतीने सलामी देण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री तथा भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, आमदार प्रवीण स्वामीं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अश्लेष मोरे, हर्षवर्धन चालुक्य, कैलास शिंदे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, मराठा सेवा संघ बाळासाहेब माने, मनसे तालुकाध्यक्ष हरीभाऊ जाधव, ॲड. शितल चव्हाण, शांतकुमार मोरे, पंढरीनाथ कोणे, सचिन जाधव, शरद पवार, हरिष डावरे, राम गायकवाड, मुस्लिम कमिटीचे बाबा औटी, याकुब लदाफ, बाबा मस्के, भूमीपुत्र वाघ, दत्ता रोंगे, कमलाकर सूर्यवंशी, दिगंबर भालेराव, धीरज बेळंबकर, अभिमन्यू भोसले, ॲड. हिराजी पांढरे, ॲड. मल्हारी बनसोडे, उमाजी गायकवाड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, तालुका दिव्यांग संघटना, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष यांच्यासह विधिज्ञ, विविध पक्ष अन संघटनेकडून अभिवादन करण्यात आले. 


 
Top